हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक आदिवासी म्हणून ओळखले जाणारे गाव आहे. आंबोली गावात गाव मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे आंबोली या गावाला पूर्वीपासून आदिवासी परंपरा, संस्कृती जपून ठेवलेली आहे, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २०५५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ६, अंगणवाडी केंद्रे ५ व समाजमंदिर २, उपकेंद्र-१, फॉरेस्ट कार्यालय – १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच २ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, ज्वारी, उडीद, तुरी ही प्रमुख पिके घेतली जातात. तसेच एक दोन शेतकरी मिरची लागवड करतात या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
आंबोली ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आंबोली गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्याचे योजना आहेत.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
आंबोली हे गाव आज डहाणू तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री
श्रीम.सुनेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज विभाग
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा
श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर
श्री.रवींद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद पालघर
मा. अशोक पाटील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत) जिल्हा परिषद पालघर